मुंबई -भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी बॉल टेम्परिंगबाबत स्पष्टीकरण दिले आहे. चेंडू चमकवण्यासाठी कोणत्याही बाह्य गोष्टी वापरण्याच्या विरोधात असल्याचे प्रसाद यांचे म्हणणे आहे. कोरोना व्हायरसमुळे येत्या काही वर्षांत क्रिकेटमध्ये बरेच बदल दिसू शकतात. संक्रमणाची शक्यता लक्षात घेता, कसोटी क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूला चमक देण्यासाठी लाळेच्या जागी कृत्रिम पदार्थाचा वापर करण्यास मान्यता मिळू शकते.
क्रिकेट कनेक्टिव्ह इव्हेंटमध्ये प्रसाद म्हणाले, "नियम सांगतात की आपण चेंडूला चमकवण्यासाठी अतिरिक्त गोष्टी वापरु शकत नाही. जर तसे केले तर बाटलीच्या झाकणाचा किंवा इतर कोणत्याही प्रतिबंधित वस्तूंचा वापर करण्यासारखीच ही गोष्ट आहे. यामुळे चेंडूत फेरफार होऊ शकतो."