रांची - क्रिकेटविश्वात धोकादायक फलंदाज असलेल्या महेद्रसिंह धोनीने 7 जुलैला 39 व्या वर्षात पदार्पण केले. धोनी सोशल मीडियावर सक्रिय नाही. म्हणून त्याच्या वाढदिवसाचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ समोर आलेले नव्हते. मात्र, आता त्याच्या 39 व्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.
लॉकडाऊन झाल्यामुळे धोनी किंवा त्याची पत्नी साक्षी यांनी कोणताही पार्टी आयोजित केली नव्हती. मात्र, व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये तो एका मित्राबरोबर केक कापताना दिसत आहे. या फोटोत त्याचा पाळीव कुत्रादेखील आहे.