मुंबई- भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी जुलै २०१९ नंतर एकही सामना खेळलेला नाही. तो मैदानात कधी परतणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे. आता ही उत्सुकता संपली असून धोनी रोहित शर्माच्या विरोधात मैदानात उतरणार आहे. हे आता नक्की झाले आहे.
बीसीसीआयने शनिवारी आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. धोनी चेन्नई या सामन्यात संघाचा कर्णधार म्हणून तब्बल आठ महिन्यांनी मैदानात उतरणार आहे.
धोनी आयसीसी विश्व करंडक २०१९ मधील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यानंतर एकही सामना खेळलेला नाही. तो क्रिकेटपासून लांब आहे. आयपीएलचा १३ वा हंगाम २९ मार्च ते १७ मे यादरम्यान खेळला जाणार आहे.
असा आहे चेन्नई सुपर किंग्जचा संघ -
- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), फाफ डु प्लेसिस, अंबाती रायुडू, केदार जाधव, रवींद्र जाडेजा, मिचेल सॅन्टनर, मोनू कुमार, करन शर्मा, सॅम करन, नारायणन जगदीसन, शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो, मुरली विजय, ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, हरभजन सिंग, इम्रान ताहीर, दीपक चहर, केएम आसीफ, लुंगी एनगीडी, शार्दूल ठाकूर, पियुष चावला, जोश हेजलवूड, आर साई किशोर.
चेन्नई सुपर किंग्ज संघाचे १३ व्या हंगामाचं वेळापत्रक -
- २९ मार्च - मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्ज
- २ एप्रिल - राजस्थान रॉयल्स vs चेन्नई सुपर किंग्ज
- ६ एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स vs चेन्नई सुपर किंग्ज
- ११ एप्रिल - किंग्ज इलेव्हन पंजाब vs चेन्नई सुपर किंग्ज
- १३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स vs चेन्नई सुपर किंग्ज
- १७ एप्रिल - किंग्ज इलेव्हन पंजाब vs चेन्नई सुपर किंग्ज
- १९ एप्रिल - सनरायजर्स हैदराबाद vs चेन्नई सुपर किंग्ज
- २४ एप्रिल - मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्ज
- २७ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs चेन्नई सुपर किंग्ज
- ३० एप्रिल - सनरायजर्स हैदराबाद vs चेन्नई सुपर किंग्ज
- ४ मे - राजस्थान रॉयल्स vs चेन्नई सुपर किंग्ज
- ७ मे - कोलकाता नाईट रायडर्स vs चेन्नई सुपर किंग्ज
- १० मे - दिल्ली कॅपिटल्स vs चेन्नई सुपर किंग्ज
- १४ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs चेन्नई सुपर किंग्ज