महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'संघासाठी खडतर निर्णय घेणाऱ्या धोनीला निवृत्ती कधी घ्यायची कळतं'

धोनी अनुभवी खेळाडू आहे. तो मागील अनेक वर्ष झाली आंतराराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. आपण कधी निवृत्ती घ्यायची हे त्याला चांगलं माहिती असणार. निवृत्तीचा निर्णय त्यानेच घेतला पहिजे. भारतीय संघासाठी आतापर्यंत त्याने अनेक खडतर निर्णय घेतले आहेत. त्यामुळे ज्यावेळी योग्य वेळ येईल, त्यावेळी तो निवृत्तीचा निर्णय घेईल, असे मत शिखर धवनने एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात व्यक्त केले.

'संघासाठी खडतर निर्णय घेणाऱ्या धोनीला निवृत्ती कधी घ्यायची कळतं'

By

Published : Sep 28, 2019, 8:54 PM IST

नवी दिल्ली - विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य सामन्याच्या पराभवानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या क्रिकेट पासून लांब आहे. दरम्यानच्या काळात धोनी लवकरच निवृत्तीची घोषणा करणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्या चर्चा अफवा निघाल्या. यावर आता भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने आपले मत व्यक्त केले आहे. निवृत्ती कधी घ्यायची हे धोनीला चांगलं कळतं.

धोनी अनुभवी खेळाडू आहे. तो मागील अनेक वर्ष झाले आंतराराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. आपण कधी निवृत्ती घ्यायची हे त्याला चांगलं माहिती असणार. निवृत्तीचा निर्णय त्यानेच घेतला पहिजे. भारतीय संघासाठी आतापर्यंत त्याने अनेक खडतर निर्णय घेतले आहेत. त्यामुळे ज्यावेळी योग्य वेळ येईल, त्यावेळी तो निवृत्तीचा निर्णय घेईल, असे मत शिखर धवनने एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात व्यक्त केले.

हेही वाचा -महेंद्रसिंह धोनी 'या' कारणाने आहे क्रिकेटपासून लांब

दरम्यान, धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतला संघात संधी देण्यात आली. मात्र. पंतला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. यामुळे 'धोनी फिरसे' अशी मागणी चाहत्यांमधून होत आहे. पण धोनीने आपली सुट्टी नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाढवत पुनरागमन लांबवणीवर टाकले आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, धोनीला विश्वकंरडक स्पर्धेत दुखापत झाली होती. याच दुखापतीमुळे धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.

हेही वाचा -इंग्लंडची महिला क्रिकेटपटू सारा टेलर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

ABOUT THE AUTHOR

...view details