महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

महेंद्रसिंह धोनी होणार निवृत्त... विराट कोहलीने दिले संकेत - टी-२० विश्वकरंडक २०१६

भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या कारणाने आणि तसेच धोनीने आफ्रिका संघाविरुध्दच्या मालिकेतून माघार घेतली. या दोन तथ्यावरुन धोनी निवृत्ती घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.

महेंद्रसिंह धोनी होणार निवृत्त... विराट कोहलीने दिले संकेत

By

Published : Sep 12, 2019, 5:19 PM IST

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित करू शकतो. या संबंधीचे संकेत भारतीय कर्णधार विराट कोहलीने दिले आहेत. दरम्यान, इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर धोनी संघाबाहेर आहे.

आयसीसी विश्वकरंडक २०१९ मध्ये भारतीय संघाचा उपांत्य फेरीत पराभव झाला. या नंतर भारतीय संघाने वेस्ट इंडीजचा दौरा केला. मात्र, धोनीने या दौऱयातून माघार घेत भारतीय लष्करासोबत वेळ घालवणे पसंत केले. त्याने भारतीय लष्करासोबत काश्मीरमध्ये गस्त घातली. त्यानंतर तो अमेरिकेला गेला तिथे त्याचे गोल्फ खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ ३ टी-२० आणि ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी धोनीची निवड संघात करण्यात आलेली नाही. या बाबत निवड समितीने सांगितले की, 'धोनीनेच आफ्रिकाविरुध्दची मालिका खेळण्यास नकार दिला आहे.'

तर दुसरीकडे भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या कारणाने आणि तसेच धोनीने आफ्रिका संघाविरुध्दच्या मालिकेतून माघार घेतली. या दोन तथ्यावरुन धोनी निवृत्ती घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.

विराटने २०१६ मध्ये झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या महत्त्वाच्या सामन्याचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी दिसत आहेत.

दरम्यान, विराटने भारतात २०१६ मध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यातील फोटो शेअर केला आहे. या सामन्यात १६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे ४ फलंदाज ९४ धावांत माघारी परतले होते. तेव्हा भारताला ३६ चेंडूंत विजयासाठी ६५ धावांची गरज होती. त्यावेळी कोहली आणि तत्कालीन कर्णधार धोनी खेळपट्टीवर होते.

या सामन्यात विराटने ५१ चेंडूंत ९ चौकार व २ षटकाराच्या मदतीने नाबाद ८२ धावा केल्या होत्या. धोनीने सामन्यात विराटला एकेका धावेसाठी पळवलं होते. शेवटी विराट चांगलाच दमला आणि त्याने खेळपट्टीवर गुडघे टेकले होते. त्याचा हा फोटो आहे. या सामन्यात धोनीने १० चेंडूत १८ धावांची नाबाद खेळी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details