महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रांची गाठताच धोनीने केली 'बाईक-सवारी'...पाहा व्हिडिओ - धोनीची रांचीतील 'बाईक-राईड' न्यूज

कोरोनामुळे सीएसकेचे प्रशिक्षण शिबिर रद्द झाल्यानंतर धोनीने सोमवारी घर गाठले. घरी पोहोचल्यानंतर, त्याने 'बाईक-राईड' केली. सुपरबाईकवर असलेल्या धोनीला पाहताच चाहत्यांनी त्याच्यासमोर सेल्फीचा आग्रह धरला.

MS Dhoni started riding bike as he reached Ranchi
रांची गाठताच धोनीने केली 'बाईक-सवारी'...पाहा व्हिडिओ

By

Published : Mar 17, 2020, 10:23 AM IST

रांची - चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षण शिबिर रद्द झाल्यानंतर संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने रांची गाठले आहे. सध्या भारतासह जगभरात फोफावत चाललेल्या कोरोनामुळे सर्वजण चिंताग्रस्त असले तरी, धोनी मात्र रांचीत 'बाईक-राईड' करताना दिसून आला. आपल्या आवडत्या खेळाडूला भर रस्त्यात हिंडताना पाहून सर्वजण चकित झाले.

हेही वाचा -कोरोनासंदर्भात रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल

कोरोनामुळे सीएसकेचे प्रशिक्षण शिबिर रद्द झाल्यानंतर धोनीने सोमवारी घर गाठले. घरी पोहोचल्यानंतर, त्याने 'बाईक-राईड' केली. सुपरबाईकवर असलेल्या धोनीला पाहताच चाहत्यांनी त्याच्यासमोर सेल्फीचा आग्रह धरला. धोनीनेही चाहत्यांना नाराज न करता चाहत्यांना सेल्फी काढू दिला. चाहत्यांना वेळ दिल्यानंतर, त्याने रांचीचील एका इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटनही खेळले.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाने सराव सत्र स्थगित केले. सीएसकेने २ मार्चपासून एमए चिदंबरम स्टेडियमवर प्रशिक्षण सुरू केले होते. कोरोनामुळे अनेक स्पर्धांमध्ये प्रेक्षकांशिवाय सामने होत असले तरी, सीएसकेचे सराव सत्र पाहण्यासाठी चाहत्यांनी मैदानावर चांगलीच गर्दी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details