जम्मू-काश्मीर - दोन महिन्यासाठी क्रिकेटपासून लांब राहण्याचा निर्णय घेतलेला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याबरोबर पहारा देण्याचे काम करत आहे. या दरम्यान धोनीचा सैनिकांसोबत व्हॉलीबॉल खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महेंद्रसिंह धोनीचा सैन्यांसोबत क्रिकेट नव्हे तर व्हॉलीबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल
वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेत धोनीने भारतीय सैन्यासोबत सीमेवर वेळ घालवणे पसंत केले. त्यानंतर तो ३१ जुलैला काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात आलेल्या १००६TA बटालियन (पॅरा) च्या टीमसोबत रुजू झाला. धोनी १५ ऑगस्टपर्यंत त्या सैन्यासोबत राहणार आहे. तो सद्या आपला वेळ सैनिकांसोबत घालवत आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेत धोनीने भारतीय सैन्यासोबत सीमेवर वेळ घालवणे पसंत केले. त्यानंतर तो ३१ जुलैला काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात आलेल्या १००६ TA बटालियन (पॅरा) च्या टीमसोबत रुजू झाला. धोनी १५ ऑगस्टपर्यंत त्या सैन्यासोबत राहणार आहे. तो सद्या आपला वेळ सैनिकांसोबत घालवत आहे.
काही तासांपूर्वी धोनी सैनिकासोबत व्हॉलीबॉल खेळत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीला २०११ मध्ये लेफ्टनंट कर्नलपदाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर धोनीने २०१५ मध्ये पॅराट्रुपरची परिक्षाही पास केली आहे.