मुंबई - भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वकरंडकात शेवटचा खेळताना दिसून येईल. तो विश्वकंरडकानंतर निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. ३७ वर्षीय धोनी त्याच्या निवृत्तीनंतर काय करणार हे एका व्हिडिओद्वारे स्पष्ट केले आहे.
धोनीचा एक व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत धोनी म्हणत आहे की, मी सर्वांशी एक गुपित शेअर करणार आहे. लहानपणापासून एक कलाकार बनण्याची इच्छा होती. मी खूपच क्रिकेट खेळलो. आता निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नव्या क्षेत्रात मला लक्ष घालायचे आहे. यासाठी काही पेंटिग्स मी तयार केली आहे.