हैदराबाद - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि तिची पत्नी साक्षी यांचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका हॉटेलमध्ये साक्षी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होती. तेव्हा धोनी साक्षीला तू इन्स्टाग्राम फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे करत असल्याचे म्हणताना दिसून येत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ धोनीच्या एका चाहत्याने शेअर केला आहे.
धोनी सद्या क्रिकेटपासून लांब असून तो कुटूंबासह 'क्वॉलिटी टाइम' घालवत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत धोनी म्हणतो की, 'तु हे सगळं इन्स्टाग्राम फॉलोअर्स वाढवण्यासाठी करत आहेस.'