मुंबई - भारतीय संघात महेंद्रसिंह धोनीला पुन्हा पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर आहेत. धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडकानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आता बीसीसीआयने धोनीला संघात पुनरागमन करायचे असेल तर एकच अट पूर्ण करावी लागेल, असे सांगितलं आहे.
बीसीसीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीला भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल तर त्याने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करायला हवी. आयपीएलमध्ये त्याने चांगली केल्यास तो संघात पुनरागमन करेल अन्यथा त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे जवळपास बंद होतील.
भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी धोनीचे भारतीय क्रिकेटसाठी मोठे योगदान असून तो आगामी टी-२० विश्वकरंडकात संघात पुनरागमन करु शकतो. यासाठी त्याला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, असे सांगितलं आहे.