मेलबर्न - ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. २०१० ते २०१९ या दशकात सर्वोत्तम एकदिवसीय संघाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाने या संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीकडे दिले आहे. धोनीशिवाय रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
ज्येष्ठ पत्रकार मार्टिन स्मिथ यांनी 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'च्या दशकातील सर्वोत्तम संघाची निवड केली. त्यांनी या संघात भारताचे धोनी, रोहित आणि विराट या खेळाडूंचा समावेश केला आहे. तर आफ्रिकेचे दोन, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी एक खेळाडू निवडले आहेत. महत्वाची बाब म्हणजे, मिशेल स्टार्क हा एकमेव ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू या यादीत आहे.