चेन्नई -कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्स संघाने सराव सत्र स्थगित केले. सीएसकेने २ मार्चपासून एमए चिदंबरम स्टेडियमवर प्रशिक्षण सुरू केले होते. या सरावादरम्यानच्या सामन्यात धोनीने शतक ठोकत आपल्या दमदार पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.
'कॅप्टन कुल' धोनीने ठोकल्या ९१ चेंडूत १२३ धावा! - धोनीचे चेन्नईकडून शतक न्यूज
धोनीने या सामन्यात केवळ ९१ चेंडूंचा सामना करताना १२३ धावा फटकावल्या. त्याने सुरेश रैनासह दमदार भागिदारी रचली. या सामन्यात धोनीने उत्तुंग षटकारही लगावले. या सराव सत्रात कर्णधार महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांनी सराव सुरू केला होता.

कोरोनामुळे अनेक स्पर्धांमध्ये प्रेक्षकांशिवाय सामने होत असले तरी, सीएसकेचे सराव सत्र पाहण्यासाठी चाहत्यांनी मैदानावर चांगलीच गर्दी केली होती. 'कोविड-१९ पासून उद्भवलेल्या परिस्थितीला पाहून चेन्नई सुपर किंग्जचे एमए सत्र १४ मार्चपासून एमए चिदंबरम स्टेडियमवर स्थगित केले जाईल', असे तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे सचिव आर. एस. रामास्वामी म्हणाले आहेत.