महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२१ : गोलंदाजांसाठी धोक्याची घंटा, धोनीचा ११४ मीटर लांब षटकार

चेन्नईने शेअर केलेल्या व्हिडिओत धोनी नेटमध्ये सराव करताना पाहयाला मिळत आहे. यात त्याने एक चेंडूवर जोरदार प्रहार केला आणि तो चेंडू थेट मैदानाबाहेर गेला. चेन्नईने या व्हिडिओला, १०९ मीटर किंवा ११४ मीटर असे कॅप्शन दिले आहे. धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ms-dhoni-hit-114-meter-long-six-during-practice-session-and-ball-reached-into-the-stadium
IPL २०२१ : गोलंदाजांसाठी धोक्याची घंटा, धोनीचा ११४ मीटर लांब षटकार

By

Published : Mar 21, 2021, 6:58 PM IST

मुंबई - चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची जय्यत तयारी सुरू केली आहे. चेन्नई स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना यांनी सरावाला सुरूवात केली आहे. या दरम्यान, धोनीचा एक व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे.

चेन्नईने शेअर केलेल्या व्हिडिओत धोनी नेटमध्ये सराव करताना पाहयाला मिळत आहे. यात त्याने एक चेंडूवर जोरदार प्रहार केला आणि तो चेंडू थेट मैदानाबाहेर गेला. चेन्नईने या व्हिडिओला, १०९ मीटर किंवा ११४ मीटर, असे कॅप्शन दिले आहे. धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, मागील हंगामात खास कामगिरी करता न आलेल्या चेन्नई संघाला यंदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्यांचे पहिले ५ सामने मुंबईत होणार आहेत. तर त्यानंतर चेन्नईचा संघ साखळी फेरीतील पुढील सामने दिल्ली, बंगळुरु आणि कोलकाता येथे खेळणार आहे. चेन्नईचा पहिला सामना १० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे.

हेही वाचा -Road Safety World Series : आज इंडिया-श्रीलंका लिजेंड्स यांच्यात 'महामुकाबला'

हेही वाचा -IND VS ENG : भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा, ऑर्चर बाहेर

ABOUT THE AUTHOR

...view details