महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विश्व करंडकातील पराभवाबाबत धोनीचा मोठा खुलासा, म्हणाला मला या गोष्टीचा...

धोनीला उपांत्य फेरीच्या सामन्यातील आपल्या धावचीत होण्याचा पश्चाताप झाला आहे. याबाबत धोनी म्हणाला, 'न्यूझीलंड विरुद्धच्या  सामन्याआधी झालेल्या लढतीतही मी धावचीत झालो होतो. त्यानंतर पुन्हा मी उपांत्य सामन्यात धावचीत झालो, तेव्हा मी निराश झालो. मी त्यावेळी उडी मारून क्रीझमध्ये लवकर का पोहोचू शकलो नाही, या गोष्टीचा मला पश्चाताप झाला.'

ms dhoni finally  breaks his silence on heartbreaking run out against new zealand in world cup 2019 semi final says why i did not dive
विश्व करंडकातील पराभवाबाबत धोनीचा मोठा खुलासा, म्हणाला मला या गोष्टीचा...

By

Published : Jan 12, 2020, 4:32 PM IST

नवी दिल्ली - आयसीसी विश्व करंडक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली. उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. या पराभवानंतर भारताचे विश्व करंडक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या विश्व करंडकाबाबत धोनीने एक मोठा खुलासा केला आहे.

धोनीला उपांत्य फेरीच्या सामन्यातील आपल्या धावचीत होण्याचा पश्चाताप झाला आहे. याबाबत धोनी म्हणाला, 'न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्याआधी झालेल्या लढतीतही मी धावचीत झालो होतो. त्यानंतर पुन्हा मी उपांत्य सामन्यात धावचीत झालो, तेव्हा मी निराश झालो. मी त्यावेळी उडी मारून क्रीझमध्ये लवकर का पोहोचू शकलो नाही, या गोष्टीचा मला पश्चाताप झाला.'

विश्व करंडकातील उपांत्य फेरीचा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. या सामन्यात न्यूझीलंडच्या 239 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे रोहित, कोहली आणि लोकेश राहुल हे तिन्ही फलंदाज झटपट बाद झाले होते. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि धोनी यांनी संघाला जिंकवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. धावांचा पाठलाग करताना जडेजाने धडाकेबाज फलंदाजी केली.

मात्र, जडेजाने फटकेबाजीच्या नादात आपली विकेट गमावली. त्यानंतर धोनीने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पण दुर्दैवीपणे मार्टिन गुप्टीलच्या थेट फेकीवर धोनी धावचीत झाला आणि भारताच्या हातून सामना निसटला. भारताला या सामन्यात १८ धावांनी पराभूत व्हावे लागले.

ABOUT THE AUTHOR

...view details