महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'कॅप्टन कुल' धोनी बनला शेतकरी!.. व्हिडिओ व्हायरल - शेतकरी धोनी लेटेस्ट न्यूज

आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबासमवेत रांची येथील फार्म हाऊसवर आहे. यापूर्वी त्याने एक ट्रॅक्टर खरेदी केला असल्याचे समोर आले होते. आता हाच ट्रॅक्टर तो सेंद्रिय शेतीसाठी वापरत आहे.

ms dhoni does organic farming in ranchi
'कॅप्टन कुल' धोनी बनला शेतकरी!.. व्हिडिओ व्हायरल

By

Published : Jun 28, 2020, 6:09 PM IST

Updated : Jun 28, 2020, 7:26 PM IST

झारखंड - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी ट्रॅक्टर चालवताना दिसत असून तो सेंद्रिय शेती करत आहे. कोरोना विषाणूमुळे भारतीय क्रिकेट आणि त्यासंबंधीत सर्व स्पर्धा सध्या ठप्प आहेत. प्रतिष्ठित टी-20 लीग आयपीएल देखील अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडू कुटुंबासमवेत घरीच वेळ घालवत असतात.

आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबासमवेत रांची येथील फार्म हाऊसवर आहे. यापूर्वी त्याने एक ट्रॅक्टर खरेदी केला असल्याचे समोर आले होते. आता हाच ट्रॅक्टर तो सेंद्रिय शेतीसाठी वापरत आहे.

व्हिडिओमध्ये धोनी ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. धोनीने महिंद्राचा स्वराज 963 एफई ट्रॅक्टर विकत घेतला असून या ट्रॅक्टरची किंमत 8 लाख रूपये एवढी आहे. या ट्रॅक्टरच्या निवडीबद्दल आनंद महिंद्रा यांनी धोनीचे कौतुक केले होते.

38 वर्षीय धोनीने आतापर्यंत भारतासाठी 350 एकदिवसीय 98 टी-20 सामने खेळले असून त्याने अनुक्रमे 10773 आणि 1617 धावा केल्या आहेत. धोनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवू इच्छित आहे. पण आयपीएलवर सध्या कोरोनाचे सावट आहे. गेल्या वर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर त्याने एकही सामना खेळलेला नाही.

Last Updated : Jun 28, 2020, 7:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details