हैदराबाद - इंग्लंड विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व जर महेंद्रसिंह धोनीकडे दिले असते, तर भारतीय संघ विश्वविजेता ठरला असता, असे मत एका क्रिकेट चाहत्याने व्यक्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेट चाहत्यांना, तुमचा या दशकातील आवडता कर्णधार कोण ? असा प्रश्न विचारला. तेव्हा एकाने आयसीसीच्या त्या ट्विटला रिट्विट करत आपलं मत व्यक्त केलं. महत्वाची बाब म्हणजे, बहुतांश क्रिकेट चाहत्यांनी धोनीला आवडता कर्णधार म्हणून निवडले.
आयसीसीने तुमचा दशकातील आवडता कर्णधार याविषयी विचारल्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी धोनीला पसंती दर्शवली. अनेकांनी तर धोनीने विश्वकरंडक घेतलेला फोटो शेअर केला आहे. महत्वाची बाब म्हणजे, पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांनीही धोनी आपला आवडता कर्णधार असल्याचे सांगितलं.