मुंबई- भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती नेहमी इंस्टाग्रामवर टिक टॉक व्हिडिओ पोस्ट करताना दिसून येते. या व्हिडिओवरून अनेकदा तिला नेटिझन्सनी ट्रोलही केलं आहे. अशात तिने आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात ती उमराव जान लूकमध्ये पाहायला मिळत आहे. या लूकने तिचे चाहते मात्र, घायाळ झाले आहेत.
हसीन जहाँने शेअर केलेला एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत हसीन जहाँ उमराव जानच्या 'इन आंखो की मस्ती के' या गाण्यावर अदाकारी सादर करताना दिसत आहे.
हसीन जहाँने याआधी बिकिनीवरील फोट फोटोशूटचा व्हिडिओ पोस्ट केला होता. यावरुन ट्रोलर्संनी तिच्यावर खालच्या थराची टीका केली होती. त्यापूर्वी हसीन जहाँने 'कांटा लगा' या डान्स नंबरवर एक व्हिडिओ केला होता. या व्हिडिओवरूनही ट्रोलर्सनी तिला सुनावले होते.