मुंबई - लॉकडाऊनमध्ये मजुरांची मदत करण्यासाठी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी रस्त्यावर उतरलेला आहे. तो स्थलांतरित मजुरांना रेशन देत असल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लॉकडाऊनच्या काळात मजूर मिळेल त्या मार्गाने आपापल्या गावी परतण्यासाठी निघाले आहे. भारतीय रेल्वेने श्रमिक ट्रेन सुरू केल्या असल्या तरी अनेक मजूर अजूनही पायी घरी जात असल्याचे दिसत आहे. या मजुरांसाठी शमी स्वतः रस्त्यावर उतरला आहे. तो या मजुरांना रेशन आणि फळे वाटत आहे. याचा व्हीडिओ व्हायरल झाला असून शमीच्या कामाचे कौतुक नेटीझन्स करीत आहेत.
मागील महिन्यात पायी जाणारा एक मजूर शमीच्या घरासमोर चक्कर येऊन पडला होता. शमीने लगेचच त्याला मदत केली आणि खाण्यासाठी अन्न दिले. शमीचे घर नॅशनल हायवेपासून जवळच आहे.