नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या मुलीचा आज वाढदिवस आहे. त्याने मुलीला शुभेच्छा देण्यासाठी एक भावनिक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने मी लवकरच तुला भेटायला येत आहे, असे म्हटले आहे. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या विश्वकरंडक स्पर्धेमध्ये मोहम्मद शमीने 4 सामन्यात 14 गडी बाद केले आहेत.
'मला तुझी खूप आठवण येत आहे', मोहम्मद शमी 'का' झाला भावूक - daughter
आज मोहम्मद शमीची मुलगी आयराचा चौथा वाढदिवस असून या निमित्ताने तो आपल्या मुलीला भेटण्यासाठी व्याकूळ झाला आहे. त्यामुळे त्याने भावनिक ट्विट करत आपल्या लाडकीची आठवण केली. तो म्हणतो, स्वीटहार्ट, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, मला तुझी खूप आठवण येते. तु काळजी करु नकोस मी कायम तुझ्यासोबत आहे. मी लवकरच तुला भेटायला येणार आहे. अशा आशयाचा ट्विट शमीने केला आहे.

मोहम्मद शमी कौटुंबिक वादामुळे पत्नी हसीन जहाँ आणि त्याची चार वर्षाची मुलगी आयरापासून दूर राहत आहे. दरम्यान, शमी नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या लाडक्या मुलीची आठवण काढत असतो. त्याने काही दिवसांपूर्वी आयराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता ज्यामध्ये आयरा डान्स करत होती. शमीची पत्नी हसीन जहाँ हिने मागील वर्षी शमीवर मारहाण, बलात्कार, हत्येचा प्रयत्न यासारखे गंभीर आरोप लावले आहेत. त्यामुळे शमी आणि जहाँच्या संबंधामध्ये वितुष्टता आली आहे.