महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

#HBDMohammadKaif : तो 'अद्भूत' झेल पकडून कैफ ठरला विजयाचा शिल्पकार!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १ डिसेंबर १९८० ला उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथे झाला. त्याने आपल्या आयुष्यातील १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दिली. कैफच्या नेतृत्वाखाली भारताने १९ वर्षांखालील विश्वकरंडकाला गवसणी घातली आणि कैफचं नाव जगासमोर आलं.

mohammad kaif celebrating 39th birthday today
#HBDMohammadKaif : तो 'अद्भूत' झेल पकडून कैफ ठरला विजयाचा शिल्पकार!

By

Published : Dec 1, 2019, 3:53 PM IST

Updated : Dec 1, 2019, 11:01 PM IST

नवी दिल्ली - काळानुरूप बदलत गेलेल्या क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणही मोठ्या प्रमाणावर सुधारत गेले. त्यामुळे आज एखाद्या खेळाडूने कितीही चांगला झेल घेतला तरी त्याचे आकर्षण म्हणावे तितके राहिले नाही. आजच्या क्रिकेटमध्ये असे जबरदस्त झेल वारंवार पकडले जातात. मात्र, एक काळ सुमार क्षेत्ररक्षणाचाही होता आणि त्यात फार मोजके खेळाडू चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जात होते. त्यातील एक नाव म्हणजे मोहम्मद कैफ. आज त्याचा ३९ वा वाढदिवस आहे. भारतीय क्रिकेटमध्ये 'क्षेत्ररक्षणातला क्रांतीवीर' अशीही कैफची विशेष ओळख आहे.

हेही वाचा -राष्ट्रकुल विजेत्या कुस्तीपटूला एका मुलाची आई असलेल्या कुस्तीपटूनं दिली मात...!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म १ डिसेंबर १९८० रोजी उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथे झाला. त्याने आपल्या आयुष्यातील १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दिली. कैफच्या नेतृत्त्वाखाली भारताने १९ वर्षांखालील विश्वकरंडकाला गवसणी घातली आणि कैफचं नाव जगासमोर आलं.

जाँटी ऱ्होड्सपासून प्रेरणा -

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज क्षेत्ररक्षक जाँटी ऱ्होड्सपासून कैफने प्रेरणा घेतली आणि त्याची अंमलबजावणी टीम इंडियात करायला सुरुवात केली. वयाच्या २० व्या वर्षी कैफने भारताच्या कसोटी संघात जागा मिळवली. त्यावेळचे युवराज सिंग आणि मोहम्मद कैफच्या क्षेत्ररक्षणाचे किस्से आजही कुतुहलाने सांगितले जातात.

तो 'अद्भूत' झेल -

नॅटवेस्ट ट्रॉफीचा हिरो अशी कैफची ओळख असली तरी, पाकिस्तानविरूद्ध त्याने पकडलेला तो 'अद्भूत' झेल आजही लोकांच्या स्मरणात आहे. या झेलमुळे भारताने पाकिस्तानला ५ धावांनी मात दिली होती. कराचीत खेळल्या गेलेल्या 'हाय टेन्शन' एकदिवसीय सामन्यात भारताने पाकसमोर ३४९ धावांचा डोंगर उभा केला होता. हा सामना भारत सहज जिंकणार असं वाटत असताना पाकिस्तान क्रिकेटचा आधारस्तंभ इंझमाम उल हकने किल्ला लढवायला सुरूवात केली. या सामन्यात त्याने दमदार शतकी नजराणा पेश केला. इंझमामनंतर शोएब मलिक आणि मोईन खान मैदानावर तळ ठोकून होते आणि पाकिस्तानला ८ चेंडूत अवघ्या १० धावांची आवश्यकता होती. मलिकने खेळलेला एक फटका कैफसाठी संधी म्हणून समोर आली. या संधीचे सोने करत कैफने अद्भूत झेल घेत विजयाचे पारडे भारताच्या बाजूने झुकवले.

कारकीर्द -

कैफने आत्तापर्यंत १३ कसोटी सामने खेळले असून ३२.८४ च्या सरासरीने ६२४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १४८ अशी आहे. १२६ एकदिवसीय सामन्यात त्याने २७५३ धावा केल्या असून या प्रकारात त्याची सर्वोच्च धावसंख्या १११ अशी आहे. कैफने टी-२० सामन्यांतही आपले कौशल्य दाखवले. ७५ टी-२० सामने खेळताना त्याने १२३७ धावा जमवल्या आहेत.

Last Updated : Dec 1, 2019, 11:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details