कोलंबो -कोरोनाचा नवीन प्रकार म्हणजे 'स्ट्रेन'ची इंग्लंडच्या क्रिकेट संघात एन्ट्री झाली आहे. इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोईन अलीला या नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचे समोर आले आहे. श्रीलंका क्रिकेट संघाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत वृत्त दिले. कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे.
४ जानेवारीला मोईन अलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य सेवा उपसंचालक हेमंत हेराथ यांनी बुधवारी सांगितले. मार्चच्या मध्यापासून श्रीलंकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून ५०,२०० रुग्णांची नोंद झाली आहे. या महामारीमुळे देशात २७७ लोकांचा जीव गेला आहे.