बर्मिंगहॅम - भारतीय संघाच्या कर्णधार विराट कोहलीला बाद करेन असे चॅलेंज दिलेल्या खेळाडूलाच इंग्लंडने संघाबाहेर बसवले आहे. आज भारत विरुध्द इंग्लंडचा सामना होत असून इंग्लंडला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी विजय आवश्यक आहे. तेव्हा भारतीय कर्णधार कोहलीचा बळी घेण्याचे चॅलेंज मोईन अलीने दिले होते. मात्र, आज मोईन अलीचाच समावेश अंतिम ११ मध्ये करण्यात आलेला नाही.
ICC WC 2019 : विराटला बाद करण्याचे दिले 'चॅलेंज'; इंग्लडने 'त्या'च खेळाडूला ठेवले संघाबाहेर - challenge
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यावेळी भारतीय संघ दबावाखाली असेल. तसेच विराट कोहलीला धावा जमवण्याचे आव्हान असेल तर मला कोहलीचा बळी घेण्याचे आव्हान असणार असल्याचे व्यक्तव्य मोईन अलीने केले होते. मोईन अली २०१८ आणि २०१९ मध्ये आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला आहे.
ICC WC 2019 : विराटला बाद करण्याचे 'चॅलेंज' दिलेल्या खेळाडूलाच इंग्लडनेच ठेवले संघाबाहेर
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यावेळी भारतीय संघ दबावाखाली असेल. तसेच विराट कोहलीला धावा जमवण्याचे आव्हान असेल तर मला कोहलीचा बळी घेण्याचे आव्हान असणार असल्याचे वक्तव्य मोईन अलीने केले होते. मोईन अली २०१८ आणि २०१९ मध्ये आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला आहे.
दरम्यान आजच्या महत्त्वाच्या सामन्यात मोईन अलीलाच संधी देण्यात आलेले नाही. मोईन अलीने एकदिवसीय आणि टी२० सामन्यामध्ये विराट कोहलीला आतापर्यंत ७ वेळा बाद केले आहे.
Last Updated : Jun 30, 2019, 5:43 PM IST