महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मिताली राजचा टी-२० क्रिकेटला अलविदा, आता 'या' कामावर देणार लक्ष

३६ वर्षीय मिताली आता एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेवर लक्ष देणार आहे. तिने ३२ टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये तीन टी-२० विश्वकरंडक स्पर्धांचा समावेश आहे. तिने २०१२, २०१४ आणि २०१६ च्या टी -२० विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. मात्र, तिच्या नेतृत्वाखाली भारताने एकदाही विश्वकरंडक उंचावलेला नाही.

मिताली राजचा टी-२० क्रिकेटला अलविदा, आता 'या' कामावर देणार लक्ष

By

Published : Sep 3, 2019, 3:27 PM IST

Updated : Oct 9, 2019, 1:42 PM IST

नवी दिल्ली -महिला क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडू म्हणून ओळखली जाणारी भारताच्या मिताली राजने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा -पहिलेच शतक अन् थेट सचिनच्या विक्रमाची बरोबरी

३६ वर्षीय मिताली आता एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेवर लक्ष देणार आहे. तिने ३२ टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये तीन टी-२० विश्वकरंडक स्पर्धांचा समावेश आहे. तिने २०१२, २०१४ आणि २०१६ च्या टी -२० विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. मात्र, तिच्या नेतृत्वाखाली भारताने एकदाही विश्वकरंडक उंचावलेला नाही.

८८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये मितालीने २३६४ धावा केल्या आहेत. या धावा करताना ३७.५२ ची तिची सरासरी राहिली आहे. या धावांमध्ये मितालीच्या १७ अर्धशतकांचा समावेश आहे.

Last Updated : Oct 9, 2019, 1:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details