महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

खिल्ली उडवणाऱ्या नेटकऱ्याला मितालीने दिले सडेतोड उत्तर

'तिला तमिळ भाषा येत नाही. ती फक्त इंग्रजी, हिंदी आणि तेलुगू भाषेचा उपयोग करते', असे एका नेटकऱ्याने मितालीला ट्विटरवर म्हटले होते. या ट्रोलिंगला मितालीने जशाच तसे उत्तर दिले आहे.

खिल्ली उडवणाऱ्या नेटकऱ्याला मितालीने दिले सडेतोड उत्तर

By

Published : Oct 16, 2019, 7:40 PM IST

नवी दिल्ली -भारतीय महिला क्रिकेट संघाची आघाडीची खेळाडू मिताली राजने खिल्ली उडवणाऱ्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे. भाषेच्या कारणावरून मितालीला एका नेटकऱ्याने ट्रोल केले होते. या ट्रोलिंगला मितालीने उलटी चपराक दिली आहे.

हेही वाचा -17 वर्षाच्या यशस्वीचा भीमपराक्रम, विजय हजारे स्पर्धेत झळकावले द्विशतक

'तिला तमिळ भाषा येत नाही. ती फक्त इंग्रजी, हिंदी आणि तेलुगू भाषेचा उपयोग करते', असे एका नेटकऱ्याने मितालीला ट्विटरवर म्हटले होते. या ट्रोलिंगला मितालीने जशाच तसे उत्तर दिले आहे. 'तमिळ माझी मातृभाषा आहे .. मी तामिळ खूप चांगली बोलते .. मला तामिळनाडूमध्ये राहण्याचा अभिमान आहे. पण प्रथम मी भारतीय आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. त्यासोबतच, प्रिय सुगू, तुमची सततची टीका, तुम्ही दररोज देत असलेला सल्ला मला पुढे जाण्याचे धैर्य देतो', असे मितालीने प्रत्युत्तरात म्हटले आहे.

मिताली राज ही महिला क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळाडूंमध्ये एक मानली जाते. भारताच्या महिला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट संघाची कर्णधार असलेल्या मितालीने नुकताच एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. मितालीने एकदिवसीय क्रिकेट खेळताना आपल्या कारकिर्दीची २० वर्ष पूर्ण केली. असा विक्रम करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. २६ जून १९९९ मध्ये तिने आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आगामी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेवर लक्ष देण्यासाठी तिने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तिने ३२ टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये तीन टी-२० विश्वकरंडक स्पर्धांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details