महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धडाकेबाज..! महिलांमध्ये असा विक्रम करणारी मिताली जगातील एकमेव खेळाडू - mithali raj in one day career

मितालीने एकदिवसीय क्रिकेट खेळताना आपल्या कारकिर्दीची २० वर्ष पूर्ण केली. असा विक्रम करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. २६ जून १९९९ मध्ये तिने आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

धुरळाच!..महिलांमध्ये असा विक्रम करणारी मिताली जगातील एकमेव खेळाडू

By

Published : Oct 9, 2019, 1:44 PM IST

मुंबई -मिताली राज ही महिला क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळाडूंमध्ये एक मानली जाते. भारताच्या महिला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट संघाची कर्णधार असलेल्या मितालीने खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. मितालीने एकदिवसीय क्रिकेट खेळताना आपल्या कारकिर्दीची २० वर्ष पूर्ण केली.

हेही वाचा -अरे बापरे!..मैदानात आग ओकणारा पांड्या असह्य, पाहा व्हिडिओ

असा विक्रम करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. २६ जून १९९९ मध्ये तिने आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आगामी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेवर लक्ष देण्यासाठी तिने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तिने ३२ टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये तीन टी-२० विश्वकरंडक स्पर्धांचा समावेश आहे.

भारताकडून मितालीने २०१२, २०१४ आणि २०१६ च्या टी -२० विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. मात्र, तिच्या नेतृत्वाखाली भारताने एकदाही विश्वकरंडक उंचावलेला नाही. ८८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये मितालीने २३६४ धावा केल्या आहेत. या धावा करताना ३७.५२ ची तिची सरासरी राहिली आहे. या धावांमध्ये मितालीच्या १७ अर्धशतकांचा समावेश आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत मितालीने २०३ सामने खेळले आहेत. या सामन्यात खेळताना तिने ७ शतके आणि ५२ अर्धशतकांसह ६७२० धावा केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details