कराची -सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरुन जोरदार चर्चा सुरू आहेत. अशातच, पाकिस्तानतच्या प्रशिक्षकपदासाठी एक नाव पुढे आले आहे. पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार मिसबाह उल हक नवीन प्रशिक्षक म्हणून पाकिस्तान संघाला लाभण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मिसबाहचे नाव प्रशिक्षकपदासाठी पुढे आले आहे. त्याच्या नावाबरोबरच, न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांचेही नाव चर्चेत आले आहे. ४५ वर्षीय मिसबाहने ७५ कसोटी आणि १६२ सामन्यात संघाची धूरा सांभाळली आहे. २०१० मध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंगनंतर, त्याने संघाला पुढे नेण्यात कामगिरी बजावली होती. २००७ च्या टी-२० विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध मिसबाहने चूकीचा फटका खेळला होता. त्यामुळे पाकिस्तानला जेतेपद गमवावे लागले होते.