महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पाकिस्तान संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी मिसबाह, वकार युनिसकडे 'ही' जबाबदारी - वकार युनिस

पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून मिसबाह-उल-हकची पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. तसेच संघाच्या निवड समिती अध्यक्षपदीही मिसबाह-उल-हक यांची निवड करण्यात आली आहे. तर माजी गोलंदाज वकार युनिस यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे.

पाकिस्तान संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी मिसबाह-उल-हक, वकार युनिस सांभाळणार 'ही' जबाबदारी

By

Published : Sep 4, 2019, 4:18 PM IST

कराची - विश्वकरंडक स्पर्धा २०१९ मध्ये पाकिस्तान संघाला उपांत्य फेरी गाठता आली नाही. यामुळे पाक संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांना पदावरुन पायउतार व्हावे लागले. आता आर्थर यांच्या ठिकाणी पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हकची पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

फिरकीपटू अश्विन पत्नीला म्हणतो, 'हे सर्व थांबव, मला सहन होत नाही.'

आज पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून मिसबाह-उल-हकची या पदासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच संघाच्या निवड समिती अध्यक्षपदीही मिसबाह-उल-हकची निवड पाक बोर्डाने केली. तर माजी गोलंदाज वकार युनिस यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे.

बायकोला जास्त वेळ दिल्याने टीम इंडियातील खेळाडू संकटात!

दरम्यान, पाकिस्तान बोर्डाने मिसबाह-उल-हकला तीन वर्षांच्या कालावधीसाठी करारबद्ध केले आहे. मिसबाहने पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. तसेच पाकिस्तान संघाकडून ७५ कसोटी, १६२ एकदिवसीय आणि ३९ टी-२० सामने खेळले आहेत. तर गोलंदाजीचे प्रशिक्षक वकार युनिस यांनी ८७ कसोटी आणि २६२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात कसोटीमध्ये ३७३ आणि एकदिवसीय सामन्यात ४१६ गडी बाद केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details