वेलिंग्टन - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केलं. तेव्हा देशभरातील नागरिकांनी याला उर्त्स्फुतपणे पाठिंबा देत कर्फ्यू पाळला. सद्या मोदींच्या या जनता कर्फ्यूची चर्चा जगभरात रंगली आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक माइक हेसन यांनी मोदी यांच्या संकल्पनेचं कौतूक केलं आहे.
हेसन यांनी मुंबईच्या बांद्रा-वरळी सी लिंकचा व्हिडिओ ट्विट करत पंतप्रधान मोदींचे कौतुक केलं आहे. त्यात ते म्हणतात की, 'अनेक वर्षे मी हॉटेलच्या खिडकीतून हे दृश्य पहिलं आहे. या मार्गावर नेहमी १००० हून अधिक गाड्यांची वाहतूक होत असते. पण भारतात आज कोरोनाविरुद्ध १४ तासांसाठी जनता कर्फ्यू होता. याचं पालन योग्य तऱ्हेने करण्यात आल्याचे दिसत आहे.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेसन यांच्या ट्विटला उत्तर दिले. ते म्हणतात की, 'तुम्ही (बांद्रा-वरळी ) लिंक पाहू शकता का? असं वाटत की, लोकं कोरोनाला समूळ नष्ट करण्यासाठी तयार आहेत.