कोलंबो - पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक मिकी आर्थर यांची श्रीलंका क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. मागील आठ वर्षात आर्थर श्रीलंका संघाचे ११ वे प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. तर, ग्रँट फ्लॉवर आणि डेव्हिड सेकर यांची सहायक सदस्य म्हणून निवड झाली आहे.
पाकच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार झालेले आर्थर आता 'या' संघाचे मुख्य प्रशिक्षक - मिकी आर्थर श्रीलंकाचे मुख्य प्रशिक्षक न्यूज
एका मीडियासंस्थेच्या वृत्तानुसार, मर्यादित षटकांच्या स्वरुपात फ्लॉवर संघाचे फलंदाजी प्रशिक्षक असतील तर, सेकर गोलंदाजीच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहेत. आर्थर यांची ही नियुक्ती दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे.

श्रीलंकेचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हथरुसिंगा आहेत. ऑस्ट्रेलियाच्या शेन मॅकडर्मोट यांना यापूर्वीच क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. या महिन्यात श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौरा करणार आहे. या दौऱ्यामध्ये त्यांना ११ डिसेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
यापूर्वी आर्थर यांनी दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. २०१६ ते २०१९ मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानने चांगले प्रदर्शन केले होते. २०१७ मध्ये पाकिस्तानने भारताला मात देत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.