महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टीम इंडियाची मुंबई इंडियन्सशी तुलना, इंग्लंडच्या माजी कर्णधाराला जाफरचे जबराट उत्तर - भारत वि. इंग्लंड पहिला टी-२० सामना न्यूज

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारतीय संघाची तुलना आयपीएलमधी संघाशी करत, टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भारताच्या माजी खेळाडू वसिम जाफरने वॉनला जबराट उत्तर देत त्याची बोलती बंद केली.

Michael Vaughan, Wasim Jaffer indulge in hilarious banter on Twitter after England beat India in 1st T20I
टीम इंडियाची मुंबई इंडियन्सशी तुलना, इंग्लंडच्या माजी कर्णधाराला जाफरने जबराट उत्तर

By

Published : Mar 13, 2021, 5:26 PM IST

अहमदाबाद - भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडने ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयावर इंग्लंडच्या चाहत्यांनी आणि माजी खेळाडूंनी आनंद व्यक्त केला. पण, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने, भारतीय संघाची तुलना आयपीएलमधी संघाशी करत, टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भारताच्या माजी खेळाडू वसिम जाफरने वॉनला जबराट उत्तर देत त्याची बोलती बंद केली.

काय म्हणाला वॉन -

भारतीय संघाच्या पराभवानंतर वॉनने एक ट्विट केलं. यात त्याने, भारतीय क्रिकेट संघाची तुलना आयपीएलमधील मुंबई इंडियन्स या संघाशी केली. त्याने, मुंबई इंडियन्सचा संघ भारतीय संघापेक्षा किती तरी पटीने चांगला आहे, असे म्हटलं. विशेष म्हणजे, वॉनने या ट्विटमध्ये मुंबई इंडियन्स आणि बीसीसीआयला टॅग केले.

वसिम जाफरने वॉनला काय उत्तर दिलं...

वॉनला उत्तर देताना जाफर म्हणाला, मायकल, सर्व संघ इतके नशिबवान नसतात की, त्यांना चार विदेशी खेळाडू खेळवता येतील.

जाफरच्या उत्तरामध्ये वॉनला याची जाणीवर करुन दिली की, इंग्लंडच्या संघातील चार खेळाडू असे आहेत जे मूळ इंग्लंड देशातील नाहीत. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन आयर्लंडचा आहे. जेसन रॉय दक्षिण आफ्रिकेचा, तर जोफ्रा आर्चर आणि ख्रिस जॉर्डन दोन्ही वेस्ट इंडिजचे, आदिल रशिद पाकिस्तानचा तर बेन स्टोक्सचा जन्म न्यूझीलंडमधील आहे.

हेही वाचा -बुमराह पेक्षा 'इतक्या' वर्षांनी मोठी आहे तिची होणारी पत्नी

हेही वाचा -IPL २०२१ : पंजाब किंग्जची जय्यत तयारी, 'या' ऑस्ट्रेलियन खेळाडूला केलं प्रशिक्षक

ABOUT THE AUTHOR

...view details