महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'भारतातल्या कसोटी खेळपट्ट्या कंटाळवाण्या आहेत' - michael vaughan latest reactions

वॉनने भारतातील कसोटी खेळपट्ट्यांबात एक ट्विट केले. 'भारतातल्या कसोटी खेळपट्ट्या कंटाळवाण्या आहेत. पहिले चार दिवस फलंदाजांचे असतात. गोलंदाजांना जास्त फायदा मिळाला पाहिजे. हा माझा आजचा विचार आहे',  असे वॉनने ट्विटमध्ये म्हटले आहे.

'भारतातल्या कसोटी खेळपट्ट्या कंटाळवाण्या आहेत'

By

Published : Oct 11, 2019, 7:11 PM IST

Updated : Oct 11, 2019, 7:40 PM IST

लंडन -पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर सध्या भारत आणि आफ्रिका संघामध्ये दुसरी कसोटी रंगते आहे. या कसोटी सामन्यादरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने भारतातील कसोटी खेळपट्ट्यांबाबत मत व्यक्त केले. 'भारतातल्या कसोटी खेळपट्ट्या कंटाळवाण्या आहेत', असे वॉनने म्हटले आहे.

हेही वाचा -अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने वृत्तपत्राविरूद्ध दाखल केला खटला, कारण...

वॉनने भारतातील कसोटी खेळपट्ट्यांबात एक ट्विट केले. 'भारतातल्या कसोटी खेळपट्ट्या कंटाळवाण्या आहेत. पहिले चार दिवस फलंदाजांचे असतात. गोलंदाजांना जास्त फायदा मिळाला पाहिजे. हा माझा आजचा विचार आहे', असे वॉनने ट्विटमध्ये म्हटले आहे.

गहुंजे मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेने आपल्या डावाला प्रारंभ केला. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने दोन बळी घेत पाहुण्यांना सुरुवातीलाच धक्के दिले. पहिल्या कसोटीत दमदार शतक झळकावणार डीन एल्गार ६ धावांवर माघारी परतला, तर, मार्करामला भोपळाही फोडता आला नाही. या दोघांना उमेशने माघारी धाडले. तर, बावुमाला शमीने बाद केले. दुसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेच्या ३ बाद ३६ धावा झाल्या आहेत.

तत्पूर्वी, विराट कोहलीचे दमदार दुहेरी शतक आणि रविंद्र जडेजाच्या ९१ धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात आफ्रिकेसमोर ६०१ धावांचा डोंगर रचला. चहापानानंतरच्या सत्रात कोहली आणि जडेजाने आफ्रिकेच्या गोलंदाजांवर आक्रमण करत संघाची धावगती वाढवली. विराटने ३३६ चेंडूंचा सामना करत नाबाद २५४ धावा रचल्या तर, १०४ चेंडूत ९१ धावांची खेळी केली. मुथुसामीने जडेजाला बाद केल्यानंतर भारताने आपला डाव ५ बाद ६०१ धावांवर घोषित केला. आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक तीन बळी घेतले.

Last Updated : Oct 11, 2019, 7:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details