मुंबई -भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. या दौऱ्यामध्ये उभय संघात तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. भारताच्या या दौऱ्याबाबत माजी दिग्गज खेळाडूंकडून विविध तर्क व्यक्त केले जात आहेत. यात इंग्लंड संघाच्या माजी कर्णधाराने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेविषयी भविष्यवाणी केली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ भारतावर वरचढ ठरेल, असे त्या कर्णधाराने मत व्यक्त केले आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने हे मत व्यक्त केले आहे. त्याने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघाला सहज हरवेल, असे म्हटलं आहे. यासंदर्भात वॉनने एक ट्विट केले आहे.
काय म्हटल आहे वॉनने त्यांच्या ट्विटमध्ये...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ३ कसोटी सामन्यांसाठी संघात नसणार आहे. पहिल्यांदाच बाबा होणाऱ्या विराटचा पालकत्व रजा घेण्याचा निर्णय अगदी अचूक आहे. पण याचाच अर्थ (विराट नसल्यामुळे) ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी मालिका अगदी सहज जिंकेल, असं वॉनला वाटते.
भारताचा कसोटी संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ -
टीम पेन (कर्णधार व यष्टीरक्षक), सिन अबॉट, जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरुन ग्रिन, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लॉयन, मायकल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्सकी, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन, मॅथ्य वेड आणि डेव्हिड वॉर्नर.
उभय संघातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अॅडलेड (दिवस-रात्र)
- दुसरा कसोटी सामना– २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
- तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी २०२१ – सिडनी
- चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गाबा
हेही वाचा -टीम इंडियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ दिसणार नव्या जर्सीत
हेही वाचा -IPL 2020 : मुंबईच्या पाचव्या विजेतेपदाबाबत सचिन म्हणाला, अफलातून विजय....