लंडन -नुकतेच भारत दौऱ्यावरून परतलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या चुकीच्या शब्दोच्चाराने सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा उल्लेख 'सुचिन' असा केल्याने त्यांच्यावर अनेकजण तोंडसुख घेत आहेत. याबाबतीत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने देखील ट्रम्प यांची फिरकी घेतली.
हेही वाचा -आशिया इलेव्हन संघात ६ भारतीय खेळाडू, 'असे' आहेत संघ
अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर पार पडलेल्या 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमात ट्रम्प यांनी अनेकांचा उल्लेख चुकीच्या शब्दोच्चाराने केला होता. 'पाकिस्तान दौऱ्यावर ट्रम्प कधी जातील आणि तेथे ते फाखर झमानच्या नावाचा उच्चार कसा करतील, याची उत्सुकता आहे', असे वॉनने ट्विटरवर म्हटले आहे.
'हा असा देश आहे जिथे जगभरातील लोक सुचिन तेंडुलकर, विराट कोहलीसारख्या महान खेळाडूंचा उत्सव करतात', असे ट्रम्प यांनी 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमात म्हटले होते. ट्रम्प यांच्या या वक्तव्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) ट्रोल केले आहे.