ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने जगातील सात महान फलंदाजांची निवड केली आहे. हे सात फलंदाज क्लार्कच्या काळात खेळलेले आहेत. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत क्लार्कने ही निवड केली.
क्लार्कने निवडले जगातील ७ महान फलंदाज, २ भारतीयांना स्थान - Michael clarke new selection news
क्लार्कने भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचा समावेश या यादीत केला आहे. या दोघांशिवाय, ब्रायन लारा, रिकी पॉन्टिंग, कुमार संगकारा, जॅक कॅलिस आणि अब्राहम डीव्हिलियर्स यांना अन्य पाच फलंदाजांमध्ये त्याने निवडले आहे.
क्लार्कने निवडले जगातील ७ महान फलंदाज, २ भारतीयांना मिळाले स्थान
क्लार्कने भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचा समावेश या यादीत केला आहे. या दोघांशिवाय, ब्रायन लारा, रिकी पॉन्टिंग, कुमार संगकारा, जॅक कॅलिस आणि अब्राहम डीव्हिलियर्स यांना अन्य पाच फलंदाजांमध्ये त्याने निवडले आहे.
क्लार्क सचिनबद्दल म्हणाला, "सचिनला बाद करणे खूप कठीण होते. तो तांत्रिकदृष्ट्या सक्षम होता. त्याच्यात कोणतीही कमतरता नव्हती." क्लार्कने विराटबद्दलही आपले मत दिले. विराट तिन्ही फॉर्मेटमध्ये तो सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे क्लार्कने म्हटले आहे.