नवी दिल्ली -ऑस्ट्रिेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल क्लार्कने नुकतीच एक शस्त्रक्रिया केली आहे. क्लार्कला त्वचेचा कर्करोग असून त्याने ही शस्त्रक्रिया झाल्यानंतरचा एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला आहे.
हेही वाचा -अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड होणार विंडीजचा नवा कर्णधार
२००६ मध्ये क्लार्कला कर्करोगाचे निदान झाले होते. त्याने युवा खेळाडूंना तोंडावर येणाऱ्या सुजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. या आजारापासून वाचण्यासाठी योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे, असे क्लार्कने म्हटले आहे.
क्लार्कवर पार पडलेली ही चौथी शस्त्रक्रिया आहे. २०१० पासून कर्करोग काउन्सिलचा क्लार्क अॅम्बेसिडर आहे. २०१४ मध्ये झालेल्या कर्करोग काउन्सिलच्या एका मोहिमेत क्लार्कने युवा खेळाडूंना त्वचेचे संरक्षण करण्याचे सांगितले होते. इंग्लंडमध्ये घेतलेल्या उपचारानंतर, क्लार्कने या आजारावर मात दिली.
मायकल क्लार्कव्यतिरिक्त २०११ मध्ये भारताच्या युवराज सिंगलादेखील कर्करोगाने ग्रासले होते. शिवाय, भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू जेपी यादव, अॅश्ने नौफ्की यांनीही कर्करोगावर मात दिली आहे.