महाराष्ट्र

maharashtra

MI vs SRH : प्ले ऑफचे तिकीट मिळवण्यासाठी मैदानात उतरेल हैदराबाद; पुढे आहे बलाढ्य मुंबई

By

Published : Nov 3, 2020, 7:17 AM IST

आज आयपीएलच्या तेराव्या हंगामातील साखळी फेरीचा अखेरचा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हैदराबादसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा असून प्ले ऑफचे तिकीट मिळवण्यासाठी त्यांना कोणत्याही स्थितीत मुंबईला पराभूत करावे लागणार आहे.

MI vs SRH Preview: Mumbai Indians stand between Sunrisers and play-off spot
MI vs SRH : प्ले ऑफचे तिकीट मिळवण्यासाठी मैदानात उतरेल हैदराबाद; पुढे आहे बलाढ्य मुंबई

शारजाह - प्ले ऑफचे तिकीट मिळवायचे असल्यास सनरायझर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सवर कोणत्याही परिस्थितीमध्ये आज विजय मिळवावा लागणार आहे. मागील सलग दोन विजयांमुळे हैदराबादचा आत्मविश्वास उंचावला आहे. तर मुंबईने गुणतालिकेत अव्वलस्थान राखत आधीच प्ले ऑफचे तिकीट पक्के केले आहे. यामुळे त्यांच्यासाठी हा सामना औपचारिक आहे.

...तर अंतिम चारमध्ये प्रवेश

हैदराबादचा संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. असे असले तरी नेट रनरेट चांगला असल्याने, ते मुंबईविरुद्ध विजय मिळवून अंतिम चार संघांमध्ये प्रवेश मिळवू शकतात. डेव्हिड वॉर्नर, वृद्धीमान साहा चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना मनीष पांडे, केन विल्समसन, जॉनी बेअरस्टोची साथ आहे. तसेच जेसन होल्डर अष्टपैलूत्व सिद्ध करीत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या मागील सामन्यात होल्डरने संदीप शर्माच्या साथीने डेथ ओव्हरमध्ये टिच्चून गोलंदाजी केली होती. नटराजन आणि फिरकीपटू राशीद खान यांच्यामुळे हैदराबादचा गोलंदाजीचा मारा वैविध्यपूर्ण असा आहे.

मुंबई इंडियन्स सुसाट

दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा संघ सुसाट फॉर्मात आहे. फलंदाजीत इशान किशन, क्विंटन डी कॉक, सुर्यकुमार यादव सातत्याने धावा करत आहेत. त्यांना हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड आणि कृणाल पांड्याच्या फटेकबाजीची साथ लाभत आहे. ट्रेंट बोल्ट आणि जसप्रित बुमराह ही वेगवान जोडी भेदक मारा करत आहे. मुंबईचा संघ आयपीएलच्या तेराव्या हंगामातील सर्वात बलाढ्य संघ ठरलेला आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ -

रोहित शर्मा (दुखापतग्रस्त), आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकुल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, इशान किशन, जेम्स पॅटिंन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, मिशेल मॅकलेनगन, मोहसिन खान, नाथन कूल्टर-नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेंट बोल्ट.

सनरायझर्स हैदराबादचा संघ -

डेविड वार्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, ऋधिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन अॅलेन, पृथ्वी राज यरा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टानलेक, टी नटराजन आणि बासिल थम्पी.

ABOUT THE AUTHOR

...view details