लाहोर - कोरोना व्हायरसमुळे जगभरात स्थिती अत्यंत वाईट बनली आहे. आर्थिक स्तरावरही प्रत्येकाला आव्हानांचा सामना करावा लागत आहे आणि म्हणूनच अनेक देशांमध्ये खेळाडूंचे मानधन कमी केले जात आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार अझर अलीने या गोष्टीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे.
मानसिकदृष्ट्या मानधन कपातीस तयार : अझर - azhar ali latest news
अझर म्हणाला, "कोणत्याही देशाची चांगली परिस्थिती नाही आणि आम्हाला ठाऊक आहे की लॉकडाऊनची परिस्थिती अजून पुढे राहिल्यास बोर्ड आम्हाला मानधनात कपात करण्यास सांगू शकेल."
![मानसिकदृष्ट्या मानधन कपातीस तयार : अझर Mentally ready to cut pay said azhar ali](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6753496-thumbnail-3x2-aa.jpg)
मानसिकदृष्ट्या मानधन कपातीस तयार : अझर
अझर म्हणाला, "कोणत्याही देशाची चांगली परिस्थिती नाही आणि आम्हाला ठाऊक आहे की लॉकडाऊनची परिस्थिती अजून पुढे राहिल्यास बोर्ड आम्हाला मानधनात कपात करण्यास सांगू शकेल."
तथापि, पीसीबीने आपल्या खेळाडूंचा पगार कमी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून चालू आर्थिक वर्षात ३० जूनपर्यंत मानधनात कपात होणार नाही.