मेलबर्न - आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडकात ८ मार्च रोजी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी जवळपास ९० हजार प्रेक्षकांनी, मेलबर्नच्या एमसीजी स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. या प्रेक्षकांपैकी एका प्रेक्षकाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या प्रशासनाने ही माहिती दिली आहे.
मेलबर्न मैदानाच्या प्रशासनाने सांगितले की, '८ मार्च रोजी झालेल्या महिला टी-२० विश्वकरंडकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी जवळपास ८६ हजारहून अधिक प्रेक्षकांनी मैदानात हजेरी लावली होती. यात एक कोरोना संशयित होता. त्याची तपासणी करण्यात आली असून, अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत.'