मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपल्या कसोटी क्रिकेटला सुरुवात करणाऱ्या मयंक अगरवालला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात प्रतिनिधित्व करायचे आहे. मयंकने २०१७-१८ च्या रणजी सामन्यात शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे निवड समितीने त्याला भारतीय संघात स्थान दिले आहे.
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मला प्रतिनिधीत्व करायचे - मयंक - mayank agarwal
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात २८ वर्षीय मंयकने पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात ७६ आणि दुसऱ्या डावात ४२ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या कसोटीतही त्याने ७७ धावांची खेळी केली.

मंयक अगरवाल
मयंक पुढे बोलताना म्हणाला की, भारताकडून मला एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट खेळायचे आहे. मला संधी मिळेल तेव्हा मी त्या संधीचे सोने करेन. एकदिवसीय क्रिकेट खेळायचे असेल तर त्यापद्धतीने स्वत:च्या खेळात बदल केला पाहिजे असेही मयंक म्हणाला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात २८ वर्षीय मंयकने पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात ७६ आणि दुसऱ्या डावात ४२ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या कसोटीतही त्याने ७७ धावांची खेळी केली.