महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

हॉटेलमध्ये परतल्यावर तू काय करतो? पत्रकाराच्या प्रश्नावर मयांकचे मजेशीर उत्तर - भारत विरुध्द बांगलादेश कसोटी सामना

बांगलादेश विरुध्द कसोटी सामन्यात मयंकच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाअखेर ६ बाद ४९३ धावा केल्या. मयंकने ३३० चेंडूचा सामना करताना २८ चौकार आणि ८ षटकारासह २४३ धावा केल्या. याच खेळीमुळे बांगलादेशचा संघ बॅकफुटवर गेला. दरम्यान, भारतीय संघाने पहिला डाव ४९३ धावांवर घोषित केला आहे.

हॉटेलमध्ये परतल्यावर तू काय करतो? पत्रकाराच्या प्रश्नावर मयांकचे मजेशीर उत्तर

By

Published : Nov 16, 2019, 10:43 AM IST

Updated : Nov 16, 2019, 11:29 AM IST

इंदूर - भारत विरुध्द बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय सलामीवीर मयांक अग्रवालने पहिल्या डावात द्विशतक ठोकले. द्विशतक पूर्ण केल्यानंतर प्रेक्षकांनी त्याचे जोरदार टाळ्या वाजवून कौतुक केले. शिवाय, विरोधी खेळाडूंनीही हस्तांदोलन करत त्याला शुभेच्छा दिल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. त्यानंतर पत्रकाराने दिवसाचा खेळ संपल्यानंतर तू काय करतो? असा प्रश्न मयांकला विचारला.

तेव्हा मयांकने मजेशीर अंदाजात उत्तर दिले. तो म्हणाला, 'मयांक पबजी खेळतो.' मयांकचे हे उत्तर ऐकून उपस्थित सर्वांना हसू आवरले नाही.

बांगलादेश विरुध्द कसोटी सामन्यात मयंकच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाअखेर ६ बाद ४९३ धावा केल्या. मयंकने ३३० चेंडूचा सामना करताना २८ चौकार आणि ८ षटकारासह २४३ धावा केल्या. याच खेळीमुळे बांगलादेशचा संघ बॅकफुटवर गेला. दरम्यान, भारतीय संघाने पहिला डाव ४९३ धावांवर घोषित केला आहे.

हेही वाचा -गंभीर ट्रोलर्स कंपनीला म्हणतो,...तर द्या हव्या तितक्या शिव्या, वाचा काय आहे प्रकरण

हेही वाचा -भारतीय संघाची विजयी आघाडी, तिसऱ्या टी-२० सामन्यात विडींजचा केला ७ गडी राखून पराभव

Last Updated : Nov 16, 2019, 11:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details