मेलबर्न -दक्षिण आफ्रिकेत होणार्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी यष्टिरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेडला ऑस्ट्रेलियाच्या संघातून वगळण्यात आले आहे. वेडच्या जागी अॅलेक्स कॅरीचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, न्यूझीलंड दौर्यावर होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी वेडचा विचार करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ एकाच वेळी दोन देशांचा दौरा करेल.
हेही वाचा - आयसीसीचा नवा पुरस्कार : पाच भारतीय खेळाडूंमध्ये चुरस
नुकत्याच पार पडलेल्या भारतासोबतच्या कसोटी मालिकेत वेडने चार सामन्यात १७३ धावा केल्या. न्यूझीलंड दौर्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ ७ फेब्रुवारीला रवाना होईल. तर, दक्षिण आफ्रिका दौर्यासाठी बायो बबलचा आढावा घेतल्यानंतर संघाला पाठवले जाईल.
मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर आफ्रिका दौऱ्यावर कसोटी संघासोबत जाणार आहेत, तर सहाय्यक प्रशिक्षक अँड्र्यू मॅक्डोनाल्ड टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघासोबत न्यूझीलंडला जातील. न्यूझीलंड दौर्यावर ऑस्ट्रेलियाला २२ आणि २३ फेब्रुवारी आणि ३, ५ आणि ८ मार्च रोजी पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे.
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ : टिम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स, सीन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, मोझेस हेन्रिक्स, नाथन लायन, मायकेल नासर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्स्की, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्क स्टेकी, मिशेल स्वेप्सन, डेव्हिड वॉर्नर.
ऑस्ट्रेलियाचा टी-२० संघ : अॅरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, एश्टन एगर, जेसन बेहेरनडॉर्फ, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, बेन मॅक्डर्मोट, रिले मेरिडथ, जो फिलिप, झाई रिचर्ड्सन, केन रिचर्ड्सन, डॅनियल सॅम्स, तन्वीर संगा, डार्सी शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन टर्नर, अँन्ड्र्यू टाय, अॅडम झम्पा.