कोलंबो - लसिथ मलिंगा हा श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचा मुख्य आधारस्तंभ मानला जातो. नुकतीच त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मलिंगाची गोलंदाजी जेवढी आक्रमक आहे तेवढीत त्याची चेंडू टाकण्याची पद्धतही खास आहे.
हेही वाचा -'माझे शरीर आता थकले आहे', टेनिस स्टार मरेने दिली प्रतिक्रिया
मलिंगाच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात लंकेला त्याच्याचसारखा हुबेहुब गोलंदाजी करणारा एक युवा गोलंदाज सापडला आहे. मथीशा पथिराना असे या १७ वर्षीय गोलंदाजाचे नाव असून तो त्रिनिटी कॉलेजचे प्रतिनिधित्व करतो. कॉलेजकडून पदार्पणाच्या सामन्यात पथिरानाने ७ धावांत ६ बळी घेतले आहे. पथिरानाची गोलंदाजी आज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मलिंगाने लंकेचे शेवटचे प्रतिनिधीत्व केले. आता तो आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेकडे लक्ष देत आहे. मलिंगाने कसोटीत ३० सामन्यांत १०१ विकेट्स, तर एकदिवसीय सामन्यांत २२६ सामन्यांत २२८ विकेट्स घेतल्या आहेत.