सिडनी - तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ९४ धावांची आघाडी घेत भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले आहे. यादरम्यान, भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर गेला आहे.
सिडनीमध्ये खेळवल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, जडेजाचा अंगठा दुखावला गेला. तेव्हा त्याच्या हाताचे स्कॅन करण्यात आले. यात त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे तो आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर झाला आहे. दरम्यान, जडेजा किमान सहा आठवडे खेळू शकणार नाही. तसेच यासंदर्भात तज्ज्ञांची मतत जाणून घेतली जाणार आहेत. त्यानंतर त्याच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे किंवा नाही हे ठरवले जाईल.
जडेजाला अशी झाली दुखापत -