नवी दिल्ली - क्रिकेटची नियामक संस्था मेरीलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) आगामी पाकिस्तान दौर्यावर तीन टी -२० आणि एक एकदिवसीय सामना खेळणार आहे. तब्बल ४८ वर्षानंतर होणारा हा दौरा १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. एमसीसीचा पहिला टी-२० सामना लाहोर कलंदर्सशी गद्दाफी स्टेडियमवर होईल. या संघात शाहीन आफ्रिदी आणि फखर जमान हे खेळाडू असणार आहेत.
एमसीसीचे कर्णधारपद कुमार संगकाराकडे असणार आहे. हेही वाचा -नेपाळचे वर्ल्ड रेकॉर्ड, विरोधी संघाला ३५ धावांत गुंडाळले
दुसऱया सामन्यात एमसीसी पाकिस्तान शाहींसशी टक्कर देईल. हा एकदिवसीय सामना एटिचसन कॉलेज ग्राउंडवर खेळवण्यात येईल. त्यानंतर पुन्हा दोन टी-२० सामने होतील. हे दोन्ही सामने पाकिस्तानच्या देशांतर्गत टी-२० चॅम्पियन नॉर्थन आणि मुलतान सुल्तान यांच्यात होणार आहेत.
एमसीसीचे कर्णधारपद कुमार संगकाराकडे असणार आहे. या संघात रवी बोपारा, रोएल व्हॅन डर मर्वे आणि रॉस व्हाइटले आहेत. 'पाकिस्तान दौरा हा सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरेल', असे एएमसी संघाचे मुख्य प्रशिक्षक अजमल शेहझाद यांनी म्हटले आहे.
एमसीसी संघ: कुमार संगकारा (कर्णधार), रवी बोपारा, मिचेल बुर्गेस, ऑलिव्हर हॅनन डेली, फ्रेड क्लासेन, मिशेल लिस्क, एरॉन लिली, इमरान कय्यूम, विल रोड्स, सफयान शरीफ, रोएल व्हॅन डर मर्वे , रॉस व्हाइटले.