महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'ज्याच्यामुळं संधी मिळाली, त्यालाच पछाडलं', लाबुशानेनं मोडला स्मिथचा विक्रम - मार्नस लाबूशेन कसोटी सरासरी न्यूज

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सिडनीच्या मैदानावर सुरू असलेल्या मालिकेच्या तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबूशेनने द्विशतक झळकावले. १९ चौकार आणि एका षटकारासह लाबुशेनने २१५ धावांची दमदार खेळी केली. लाबुशेनने स्मिथचा कसोटीतील सरासरीचा विक्रम मोडित काढत दुसरे स्थान पटकावले.

Marnus Labuschagne smashes maiden Test double ton
'ज्याच्यामुळं संधी मिळाली, त्यालाच पछाडलं', लाबुशानेनं मोडला स्मिथचा विक्रम

By

Published : Jan 4, 2020, 12:01 PM IST

सिडनी -२०१९ मधील अ‌ॅशेस मालिकेत पार पडलेल्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला दुखापत झाली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या ताशी १४८ किमीच्या बाऊंन्सरने स्मिथ जायबंदी झाला. त्याच्या जागी मार्नस लाबूशेन या फलंदाजाची निवड झाली. स्मिथसारख्या नामवंत फलंदाजाला 'रिप्लेस' करणे कठीण होते, मात्र याच लाबूशेनने स्मिथच्या मोठ्या विक्रमाला मागे टाकले.

हेही वाचा -धावांची बरसात करणारा 'युनिव्हर्स बॉस' आता टिकटॉकवर बरसणार!

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सिडनीच्या मैदानावर सुरू असलेल्या मालिकेच्या तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबूशेनने द्विशतक झळकावले. १९ चौकार आणि एका षटकारासह लाबुशेनने २१५ धावांची दमदार खेळी केली. लाबुशेनने स्मिथचा कसोटीतील सरासरीचा विक्रम मोडित काढत दुसरे स्थान पटकावले. १४ सामन्यांतील २२ डावात लाबुशेनची सरासरी ६३.६३ अशी आहे. या डावांत त्याने १४०० धावाही जमवल्या आहेत. शिवाय या नवीन वर्षात पहिला द्विशतकवीर होण्याचा मानही त्याने पटकावला आहे. कसोटीतील सर्वाधिक सरासरीचा विक्रम ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे.

यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध एडलेड कसोटीत लाबूशेनने ६३ आणि १, पर्थ कसोटीत १४३ आणि ५० ,पाकिस्तानविरुद्ध त्याने एडलेडमध्ये १६२ आणि ब्रिस्बेनमध्ये १८५ धावा केल्या. अ‍ॅशेस मालिकेत स्टीव्ह स्मिथच्या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियन संघात रुजू झालेल्या लाबूशेनने तिसर्‍या क्रमांकावर आपला दावा मजबूत केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details