लीड्स - इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये हेडिंग्ले मैदानावर अॅशेसची तिसरी कसोटी सुरू आहे. दुखापतग्रस्त स्टीव स्मिथच्या जागी संधी मिळालेल्या मार्नस लाबूशेनने सामन्याच्या दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
जे इंग्लंडच्या संघाला करता आले नाही, ते ऑस्ट्रेलियाच्या 'या' फलंदाजाने एकट्याने करून दाखवले - लाबूशेन
या सामन्याच्या पहिल्याच डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या ६७ धावांत बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या लाबूशेनने मात्र पहिल्या डावात ७४ तर, दुसऱ्या डावात ८० धावा केल्या. दोन्ही डावात विरोधी संघाच्या एका डावातील एकूण धावसंख्येपेक्षा जास्त धावा करण्याची कामगिरी लाबूशेनने केली आहे.

असा विक्रम करणारा लाबूशेन जगातील पाचवा तर ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज आहे. यामध्ये जस्टीन लँगर, डॉन ब्रॅडमन, गार्डन ग्रीनिज आणि मॅथ्यू हेडन यांचा समावेश आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने ३ बाद १५६ धावा केल्या आहेत. जो रुटने केलेल्या नाबाद ७५ धावांच्या जोरावर इंग्लंडने सामन्यावरील वर्चस्व राखले. इंग्लडला हा सामना जिंकण्यासाठी आणखी २०३ धावांची आवश्यकता असून जो रुट मैदानात टिकून आहे.