नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेनने कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीपेक्षा स्टीव्ह स्मिथ सरस असल्याचे म्हटले आहे. मात्र मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार विराटचा सामना कोणीच करू शकत नसल्याचेही त्याने कबूल केले आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत मैदानात टिच्चून फलंदाजी करण्याची स्मिथची क्षमता त्याला इतर फलंदाजापासून वेगळे करते, असेही लाबुशेनने म्हटले आहे.
''कसोटी क्रिकेटमध्ये विराटपेक्षा स्मिथच सर्वोत्तम'' - marnus labuschagne on virat
मार्नस म्हणाला, ''स्मिथने भारतात तसेच इंग्लंडमध्येही धावांचा रतीब घातला आहे. ऑस्ट्रेलियामध्येही तो सातत्याने चांगला खेळ करत आहे. त्यामुळे तो कुठे खेळतो आणि कोणत्या परिस्थितीत खेळतो, याचा त्याच्या फलंदाजीवर काहीच फरक पडत नाही.''
आपल्या अनोख्या फलंदाजीच्या जोरावर स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढतो. त्याच्या या गुणामुळेच तो कसोटीच प्रथम क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. मार्नस म्हणाला, ''स्मिथने भारतात तसेच इंग्लंडमध्येही धावांचा रतीब घातला आहे. ऑस्ट्रेलियामध्येही तो सातत्याने चांगला खेळ करत आहे. त्यामुळे तो कुठे खेळतो आणि कोणत्या परिस्थितीत खेळतो, याचा त्याच्या फलंदाजीवर काहीच फरक पडत नाही.''
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विराट सर्वोत्तम आहे. त्याने ज्या प्रकारे मागची काही वर्षे क्रिकेट खेळले आहे, ते बघता आपल्या लक्षात येते की, सामना संपवण्यात आणि धावांचा पाठलाग करण्यात विराटचा हात कोणीच पकडू शकत नाही. मी त्याचा खेळ बघून खूप काही शिकलो असल्याचेही लाबुशेनने स्पष्ट केले आहे.