लंडन - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडच्या मतानुसार त्यांचा संघ वनडे क्रिकेटमध्ये ५०० धावा करणारा पहिला संघ बनू शकतो. सध्या इंग्लंडच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम आहे. इंग्लंडच्या संघाने यापूर्वी ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळताना ४८१ आणि ४४४ धावा केल्या आहेत.
मार्क वूड म्हणतो... इंग्लंडचा संघ वनडे क्रिकेटमध्ये करू शकतो ५०० धावा
इंग्लंडच्या संघाने यापूर्वी ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळताना ४८१ आणि ४४४ धावा केल्या आहेत
इंग्लंड
एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मार्क वूड म्हणाला की, 'आमचा संघ वनडेमध्ये कोणतेही मोठे लक्ष्य गाठू शकतो. ३५० ही धावासंख्या गाठणे आमच्यासाठी साधारण गोष्ठ आहे. आमचा संघ ४०० धावांचा टप्पाही सहज पार करतो.'
इंग्लंडचा संघ शुक्रवारी ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध ५ वनडे सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना खेळणार आहे. या मालिकेत इंग्लंडने २-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.