लंडन -विश्वचषकाला आता अवघे ६ दिवस शिल्लक राहिले असून प्रत्येक संघ तयारी करण्यात व्यग्र आहे. दुसरीकडे क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी कोणता संघ विश्वचषक जिंकणार, कोणता खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करेल याचे भाकीत वर्तवत आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू मार्क वॉने ३ असे फलंदाज निवडले आहेत जे या विश्वचषकातील सर्वोत्तम फलंदाज ठरतील.
मार्क वॉच्या मते 'हे' ३ फलंदाज ठरतील विश्वचषकातील सर्वोत्तम फलंदाज, एका भारतीयाचा समावेश - Cricket World Cup
यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीने डेव्हिड वॉर्नर आपल्या स्फोटक खेळीने विश्वचषक स्पर्धेत धुमाकूळ घालणार असल्याचे म्हटले आहे
मार्क वॉच्या मते भारताचा कर्णधार विराट कोहली, इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलर आणि डेव्हिड वॉर्नर हे या विश्वचषक स्पर्धेतीस सर्वोत्तम फलंदाज ठरतील असे म्हटले आहे. यात मार्कने कोहलीला पहिल्या, बटलरला दुसऱ्या तर वॉर्नरला तिसऱ्या स्थानी ठेवले.
या तिन्ही फलंदाजांनी आजवर जागतिक स्तरावर दमदार कामगिरी करून दाखवली आहे.यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीने डेव्हिड वॉर्नर आपल्या स्फोटक खेळीने विश्वचषक स्पर्धेत धुमाकूळ घालणार असल्याचे म्हटले आहे. इंग्लंडमध्ये येत्या ३० मे पासून विश्वकरंडक स्पर्धा खेळली जाणार आहे.