मेलबर्न -ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉईनिसवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दंड ठोठावला आहे. बिग बॅश लीगमधील एका सामन्यात स्टॉईनिसने विरोधी संघातील एका खेळाडूला शिवीगाळ केली, त्यासाठी त्याला ७५,०० डॉलर्स म्हणजेच तब्बल साडे पाच लाखांचा दंड आकारण्यात आला.
हेही वाचा -'ज्या वयात लोकांचं करियर सुरू होतं, त्या वयात माझं संपलं'
मेलबर्न स्टार्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात शनिवारी हा सामना खेळला गेला. स्टॉईनिसने गोलंदाजी करतांना रेनेगेड्सचा फलंदाज केन रिचर्डसनवर भाष्य केले. त्यानंतर, स्टॉईनिसने आपली चूक कबूल केली आहे. 'मी चूक करतानाच पकडलो गेलो होतो. मी केलेले सर्व काही चुकीचे आहे आणि हे मी कबूल करतो. केन रिचर्डसन आणि पंच या दोघांकडे मी दिलगिरी व्यक्त केली', असे स्टॉईनिसने दंड आकारल्यानंतर म्हटले आहे.
दोन महिन्यांपूर्वी वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सलादेखील अशाच वादामुळे एका कसोटी सामन्यावरील बंदीचा सामना करावा लागला होता. ज्याने मार्श शेफील्ड शील्ड स्पर्धेत क्वीन्सलँडविरूद्ध अपमानकारक शब्दांचा वापर केला. स्टॉईनिस आणि पॅटिन्सन यांनी लेव्हल २ चा गुन्हा केला आहे, ज्यात १०,००० डॉलर्स पर्यंत दंड ठोठावण्यात येतो.